आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्युरिऑसिटीचा संगणक बिघडल्याने मंगळावरील काम थांबले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने मंगळ ग्रहावर संशोधनासाठी पाठवलेल्या रोव्हर क्युरिऑसिटीने काम करणे बंद केले आहे. त्याच्या संगणकाची मेमरी करप्ट झाली आहे. रोव्हर सुरक्षित असून संगणकातील बिघाड सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांतच रोव्हर पुन्हा आपल्या मोहिमेवर काम करू लागेल, असे नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. रोव्हरच्या फ्लॅश मेमरीमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे अन्य काही संगणकही बंद पडले आहेत. आम्ही पुन्हा ते संगणक सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. क्युरिऑसिटीमध्ये दोन संगणक आहेत. त्यापैकी एक ए बाजूला तर दुसरा बी बाजूला आहे. या दोन्हींपैकी एक संगणक बिघडल्यास दुसरा संगणक मोहिमेवर मदत करतो. सध्या क्युरिऑसिटीचा बी बाजूचा संगणक काम करत आहे, असे नासाच्या जेट प्रोप्लशन प्रयोगशाळेचे प्रकल्प व्यवस्थापक रिचर्ड कुक यांनी सांगितले.