आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण आफ्रिकेतील ओसाड मैदानांवर विचित्र रहस्यमय आकृत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेतील उजाड मैदानांमध्ये विचित्र गोलाकार रहस्यमय आकृत्या पाहावयास मिळतात. मातीवर छोट्या घरट्यांप्रमाणे दिसणा-या या आकृत्या हजारोंच्या संख्येने दिसतात. त्यांना ‘फेअरी सर्कल्स’ असे नाव देण्यात आले आहे. 2 ते 15 मीटर व्यासाचे हे गोलाकार नामीबिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या 160 किलोमीटर अंतरावर दिसून येतात. 1971 मध्ये ते सर्वप्रथम दिसून आले होते. तेव्हापासून या आकृत्यांवर अनेक संशोधने केली गेली, मात्र निष्कर्ष काहीच निघाला नाही. हँबर्ग विद्यापीठातील जीवशास्त्राचे जर्मन प्राध्यापक नॉबर्ट जर्गन्स यांच्या मते, या गोलाकारांमध्ये आढळलेल्या ‘सेमोटरमस एलोसरस’ नावाच्या मातीतील कीटकांचे हे काम आहे.

वनस्पती खाल्ल्यानंतर हे कीटक मातीवर गोळे तयार करतात. त्यानंतर माती खोदून या गोळ्यांच्या सभोवताली गोलाकार तयार करतात. खोदलेल्या मातीतील पाण्यामुळे त्यावर गवत उगवते आणि कीटकांना अन्न मिळते. फ्लोरिया विद्यापीठातील जैवशास्त्रज्ञ डॉ. शिनकेल यांच्या मते, अशा कीटकांचे वास्तव्य मातीच्या गोळ्यांमध्ये खूप खोलवर असते. ते कधीही अस्तित्वाच्या खुणा सोडत नाहीत. तर स्थानिक हिम्बा लोकांच्या मते, जमिनीखालील ड्रॅगनच्या श्वासोच्छ्वासामुळे भूपृष्ठावर अशा प्रकारच्या आकृत्या तयार होतात.
theindependent.com