आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

503 कोटीच्या विवाहाची छायाचित्रे, सृष्टीचे लग्न ठरले महागड्या पाच पैकी एक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या रविवारी भारत चार राज्याच्या निकालात व्यस्त होता तर तिकडे स्पेनमधील बार्सिलोना शहर जणू काही थांबलेच होते. कारण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पंगतीत बसणारे स्टील किंग लक्ष्मीनिवास मित्तल यांच्या पुतणीचे त्यादिवशी लग्न होते. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार या हायप्रोफाईल विवाहासाठी 503 कोटी रूपये खर्च आला.
सृष्टी मित्तल लक्ष्मी निवासची पुतणी आणि लहान भाऊ प्रमोद मित्तलची मुलगी आहे. 26 वर्षीय सृष्टीने इनवेस्टमेंट बॅंकर गुलराज बहलसोबत रविवारी सात फेरे घेतले. स्पेनमधील न्यूज पोर्टल साईट वानीटिस.कॉम ने या विवाहाला जगातील पहिल्या पाच महागड्या लग्नापैकी एक असे म्हटले आहे. याचबरोबर 1981 मध्ये अबुधाबीत राजकुमार मोहम्मद बिन जाएद अल नाहयान आणि राजकुमारी सलमा यांच्या विवाहानंतरचा (604 कोटी रूपये) मित्तल परिवारातील हा विवाह सगळ्यात महागडा असल्याचे फोर्ब्‍स ने सांगितले आहे.
या विवाहात मित्तल परिवाराने आणि व्हीव्हीआयपी पाहुण्यांनी या सोहळ्याचा आनंद लुटला असेल पण बार्सिलोना शहरवासियांना मात्र त्रासदायक ठरला. कारण अनेक ठिकाणी कर्फ्यू सारखी स्थिती होती. चमकदार आणि भडकाऊ कपडे घातलेले व-हाडी मंडळी संगीताच्या तालावर नाचत होते. सृष्टीचे वडिल प्रमोद यांनी एका हेलिकॉप्टरद्वारे विवाह समारंभाचे क्षण टिपण्यासाठी विशेष कॅमेरामन तैनात केले होते. 60 किलोग्रामचा केक, बलून, फूलांनी सजविलेले दरवाजे, डोळ्यांना मोहून टाकणारी रोषणाई लग्नाचे मुख्य आकर्षण होते.
विवाहाचे अनेक कार्यक्रम स्पेनच्या ऐतिहासिक ठिकाणी पार पडले. स्पॅनिश टुरिजम बोर्डने या विवाह समारंभाला परवानगी दिली होती. त्यामुळे या लग्नासाठी प्रथमच अनेक ऐतिहासिक स्मारके बंद ठेवण्यात आली होती. 2002 मध्ये लक्ष्मीनिवास मित्तल यांनी मुलाच्या लग्नासाठी कोलकात्याचे विक्टोरिया मेमोरियल 9 लाख रुपयांना भाड्याने घेतले होते. 2004 मध्ये मुलगी वनीषाचे लग्न भारतीय अब्जाधिश उद्योगपती अमित भाटियासोबत झाले. या लग्नासाठी सुमारे 240 कोटी रुपये खर्च आला होता.
पुढील स्लाईडवर बघा शाही लग्नाची छायाचित्रे... सामिल व्हा या समारंभात...