सावधान! तुमचा मोबाइल / सावधान! तुमचा मोबाइल फोन हॅक होऊ शकतो !

वृत्तसंस्था

Dec 28,2011 11:11:20 PM IST

लंडन - जीएसएम मोबाइल फोन वापरणा-या सर्वांसाठी हा इशारा आहे. हा फोन हॅक करणे सोपे असल्याचे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाइल कम्युनिकेशन अर्थात जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित फोन वापरणा-यांची संख्या जगात जास्त असून विशेषत: कार्पोरेट फोन सिस्टिम हॅक करण्याचे उद्योगही काही उपद्व्यापी व्यक्तींनी केले आहेत.
जगभरात मोबाइल फोनचे हे तंत्रज्ञान लोकप्रिय असून जगातील मोबाईल बाजारात सुमारे 400 कोटी मोबाईलधारक जीएसएम प्रणालीचा वापर करतात.हा आकडा एकूण संख्येच्या 80 टक्के आहे. बर्लिन येथे आयोजित एका परिसंवादात जर्मनीच्या सुरक्षा संशोधन लॅबचे प्रमुख क र्स्टन नोल यांनी धक्कादायक माहिती प्रात्यक्षिकांव्दारे करुन दिली. ते म्हणाले,या वायरलेस तंत्रज्ञानवर आधारीत मोबाईलवर हल्ला करणे अत्यंत सोपे आहे. हल्ला करुन फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवले जाते.त्यानंतर त्याव्दारे टेक्सट मेसेज,फोन कॉलही केले जातात.थोड्याशा वेळातही आपण हजारो मोबाईलवर आक्रमण करुन त्यावर ताबा मिळवू शकतो असे नोल यांनी स्पष्ट केले.
400 कोटी - जीएसएम तंत्रज्ञानावर आधारीत मोबाईल धारकांची संख्या असून ती जगभरात लोकप्रिय आहे. व्हॉइस आणि टेक्स्ट मेसेज (एसएमएस)साठीचे सुरक्षाविषयक नियम हे सन 1990 चे आहेत.पण त्यानंतर तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले पण नियम मात्र जुनेच आहेत.असे या संस्थेने सांगितले. स्मार्टफोनवर अशा प्रकारचे छोटेमोठे हल्ले करण्यात यापूर्वी करण्यात आले पण आता जीएसएम तंत्रज्ञान वापणा-या कोणत्याही फोनवर सायबर हल्ला करुन माहिती चोरली जाणे शक्य आहे.विशेषत: कॉर्पोरेट फोन सिस्टीम्सवर असे हल्ले वाढले आहेत. बिझनेस फोन सिस्टीम्स हॅक करुन ग्राहकांना फोन केले जातात.त्यांच्या पैशांवर डल्ला मारला जातो व ही चोरी लक्षात येण्याअगोदरच हे हॅकर्स अलगदपणे निसटून जातात. फोन वापरणा-या व्यक्तिला त्याचे बिल आल्यावरच ही गोष्ट लक्षात येते. नोल यांनी हॅकर्स कसे हल्ले करतात याचा तपशील सांगितला नाही पण हॅकर्स काही आठवड्यातच डुप्लिकेट कोड तयार करतात असे ते म्हणाले.

X
COMMENT