आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल, दागिने ही गुगलच्या पासवर्डची किल्ली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंटरनेटवरील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल कंपनीने यूएसबी कीजसोबत प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पासवर्ड म्हणून मोबाइल किंवा तुमचे दागिने वापरण्यात आले तर आश्चर्य वाटायला नको.
कंपनीच्या तंत्रज्ञांनी अशा प्रकारची योजना तयार केली आहे. त्यात कंपनीच्या भारतीय तंत्रज्ञांचादेखील समावेश आहे. याविषयीची सविस्तर माहिती फेब्रुवारीमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. फिजिकल कीमध्ये तिच्या हरवण्याचा धोकाही कंपनीने लक्षात घेतला आहे. म्हणूनच पासवर्ड म्हणून वापरण्यात येणारी वस्तू हरवल्यानंतर तिच्या जागी दुस-या वस्तूची नोंद करण्याची प्रक्रियाही सोपी होणार आहे. त्यावर कंपनीचे काम सुरू आहे, असे गुगलचे सुरक्षाविषयक उपाध्यक्ष एरिक ग्रॉस आणि तंत्रज्ञ मयंक उपाध्याय यांनी म्हटले आहे. इतर कंपन्यांनी अगोदर यासंदर्भात काम केले आहे; परंतु त्यांना फारच कमी यश हाती आले होते. म्हणूनच आमचा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी होत नाही किंवा स्वीकारला जात नाही, तोपर्यंत आम्ही त्याचे लाँचिंग करणार नाहीत. त्या अगोदर आम्ही त्याचा इतर संकेतस्थळावर प्रयोग करणार आहोत.

कार्य कसे असेल ? : यूबी की लावण्यात आल्यानंतर संगणक किंवा लॅपटॉप सुरू होताच युजर थेट गुगल अकाउंटवर जाऊन पोहोचतो. त्याला लॉग इनची कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. अर्थात कोणताही वेगळा पासवर्ड लावायची आवश्यकता भासत नाही.
काय आहे यूबी की ?
नवीन तांत्रिक योजनेवर काम करण्यासाठी विशिष्ट आकारातील लहान यूएसबी तयार करण्यात आला आहे. त्याला यूबी की असे नाव देण्यात आले आहे. तो संगणकामध्ये लावावा लागणार आहे. त्यानंतर मोबाइलसाठी काही वायरलेस चिप तयार करण्यात आल्या आहेत. दागिन्यांमध्येदेखील अशी स्मार्ट चिप बसवता येणार आहे. कनेक्टिव्हिटी नसतानाही स्मार्ट चिप तुमची ओळख सांगण्यास समर्थ असेल;