आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Number News In Marathi, Abudhabi, Divya Marathi

एका मोबाइल क्रमांकासाठी त्यांने मोजले 13 कोटी रुपये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - चारचाकी गाड्यांपासून ते दूरध्वनी क्रमांकांपर्यंत व्हीआयपी नंबरची हौस काही नवीन नाही. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये व्हीआयपी क्रमांकांचा जाहीर लिलावच होऊ लागला आहे. मात्र, एखाद्या व्हीआयपी मोबाइल क्रमांकासाठी कोणी किती पैसे मोजू शकतो? अबुधाबीमध्ये एका व्हीआयपी मोबाइल क्रमांकासाठी तब्बल 13 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत.


धर्मादाय लिलावात 777-7777 हा व्हीआयपी क्रमांक 78,77,777 दि-हम म्हणजेच सुमारे 13.12 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आला आहे. एतिसालात या मोबाइल कंपनीच्या या क्रमांकाबरोबर एक बंपर पॅकेजही दिले आहे.
एतिसालात कंपनीने अज्ञात खरेदीदाराला या क्रमाकांबरोबरच डायमंड प्लस पॅकेज दिले आहे. या पॅकेजमध्ये दर महिन्याला 22,500 फोन मिनिटे, 22,500 टेक्स्ट मेसेजेस आणि 100 जीबी डाटा मिळणार आहे. याचाच अर्थ असा की, या क्रमांकावरून दररोज 12 तासांची बातचीत आणि 725 मेसेज केले जाऊ शकतात. एतिसालातच्या वेबसाइटवर सर्वसाधारण व्हीआयपी पॅकेज दरमहा 14,073 रुपये आहे. या शानदार क्रमांकाचे मालकी हक्क मिळत नाही.