आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरातल्या घरातच बोलण्यासाठीही मोबाइल व इंटरनेटचा वापर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - समोरासमोर जाऊन बोलण्याऐवजी एकाच घरात राहणारी अर्धीअधिक माणसे परस्परांशी संवाद साधण्यासाठी मोबाइल फोन आणि संगणकाचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती एका अध्ययनात समोर आली आहे.
घरातील अन्य सदस्यांशी बोलण्यासाठी आपल्या खोलीतून उठून त्याच्या खोलीत जाण्याऐवजी आपण फोन कॉल, टेक्स्ट मेसेज, ट्विट आणि ई-मेलचा वापर करत असल्याचे 45 टक्के लोकांनी मान्य केले आहे. प्रत्येक पाचमधील एक व्यक्ती म्हणजेच 22 टक्के लोक समोरासमोर जाऊन बोलण्याऐवजी फोन कॉल्स, टेक्स्ट मेसेजिंग किंवा फेसबुक व ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

हॅलिफॅक्स इन्शुरन्स डिजिटल होम इंडेक्सने हे संशोधन केले आहे. ब्रिटनमधील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकांना म्हणजेच 73 टक्के लोकसंख्येला फोन्स, गॅजेट्स, लॅपटॉप, एमपीथ्री प्लेअर्सशिवाय एकही दिवस करमत नसल्याचे या निर्देशांकात म्हटले आहे. एंगेजमेंट किंवा लग्नाच्या रिंगपेक्षाही लोकांना आपला स्मार्टफोन महत्त्वाचा वाटतो. ही रिंग हरवली तरी चालेल, पण स्मार्टफोन हरवू नये, असे त्यांना वाटते. ब्रिटनमधील सरासरी एका महिलेकडे 4058 रुपये किमतीचेस तर पुरुष 4294 रुपये किमतीचे गॅजेट आहे.

गॅजेट्सच्या स्क्रीन किंवा प्लगिंग्जवर डोळे खिळून राहण्याच्या वेळात जास्तीत जास्त वाढ होत चालली आहे. त्यामुळे वास्तविक जीवनातील संबंधांमध्ये वृद्धी करण्यासाठीच्या थेट ‘आय टू आय’ संपर्काची वेळ घटत चालली आहे. आज जन्मलेले मूल सातव्या वर्षापर्यंत 24 तासांच्या अख्ख्या एक वर्षाचा वेळ स्क्रीन पाहण्यात वाया घालवेल. जेव्हा ते 80 वर्षांचे होईल तेव्हा त्याने 18 वर्षे केवळ स्क्रीनसमोर वाया घालवलेली असतील. हा कालावधी त्याच्या आयुष्याच्या एक चतुर्थांश असेल, असे सिगमन यांनी म्हटले आहे.

बेड, बाथरूममध्येही गॅजेटसोबतच
संवादाच्या पोर्टेबल उपकरणांच्या संख्येत होत असलेली प्रचंड वाढ एक नवी पिढीच जन्माला येत आहे. ही पिढी या उपकरणांशिवाय क्षणभरही स्वस्थ राहू शकत नाही, ही धोक्याची सूचना असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ब्रिटनच्या लोकसंख्येपैकी 25 टक्के लोक तर बेडमध्ये, तर दहापैकी एक व्यक्ती बाथरूममध्येही इमेल आणि मेसेज चेक करत असल्याचे आढळून आले आहे.

कौटुंबिक जीवनला तडा
सर्वच वयोगटातील माणसे तंत्रज्ञानावर वाजवीपेक्षा जास्त विसंबून राहू लागल्यामुळे नातेसंबंध खिळखिळे होत चालले आहेत. सामाजिक मानसिकता बदलत चालली आहे. तंत्रज्ञानाचा अवास्तव वापर कौटुंबिक जीवनच उद्ध्वस्त करत असल्यामुळे कुटुंबातील वडीलधा-या नी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. डॉ. अ‍ॅरिक सिगमन, मानसोपचारतज्ज्ञ