आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरीकरणाने जैविक घड्याळात बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - शहरात राहणार्‍यांची जीवनशैली भौतिक साधन-सुविधांनी युक्त असते, परंतु शहरी वातावरणामुळे मानवाच्या जैविक घड्याळात मोठय़ा प्रमाणात बदल होऊ शकतो, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.

ब्रिटनमधील ग्लॉसगो विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासासाठी त्यांना मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर ऑर्निथॉलॉजी या र्जमनीतील संस्थेचीही मदत झाली आहे. शरीराच्या दैनंदिन प्रतिक्रियांचा अभ्यास यात महत्त्वाचा ठरला. हा अभ्यास सलग दहा दिवसांपर्यंत करण्यात आला. मानवाबरोबरच इतर सजीवांच्या दैनंदिन जीवन शहरी वातावरणामुळे प्रचंड प्रमाणात प्रभावित झाले आहे. शहरी वातावरणाचा परिणाम टाळणे कठीण असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.

शहरी भागात राहणार्‍या माणसांसह पक्ष्यांच्या कार्यक्षमता आणि सक्रियतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पक्ष्यांचा अभ्यासात शहरी पक्षी 40 मिनिटे अधिक सक्रिय पाहण्यात आला. त्याचबरोबर त्याची उडण्याची क्षमता ग्रामीण पक्ष्यांपेक्षा जास्त आहे. तो तुलनेने 50 मिनिटे अधिक वेगाने उडू शकतो, असे ग्लॉसगोच्या प्रमुख संशोधक बार्बरा हेल्म यांनी सांगितले आहे.

अभ्यासात काय आढळले ?
संशोधकांनी या प्रकल्पात माणसाबरोबरच पक्ष्यांचाही अभ्यास केला. ब्लॅकबर्डचा त्यात समावेश होता. शहरी आणि ग्रामीण भागातील विशिष्ट पक्ष्यांचा दिनक्रम जाणून घेण्यात आला. शहरी पक्षी अधिक चपळ असल्याचे लक्षात आले. विश्वास बसत नसला तरी शहरी पक्षी पहाटे लवकर उठतो. तो विर्शांतीही कमी प्रमाणात घेतो.

काय असते बायोलॉजिकल क्लॉक ?
निसर्गातील बदलानुसार प्रतिक्रिया देण्याची यंत्रणा प्रत्येक सजीवाच्या शरीरात असते. दैनंदिन जीवनात शरीराची अशी लय महत्त्वाची ठरते. चोवीस तासांतील शरीरातील या विशिष्ट क्रिया-प्रतिक्रियांच्या चक्राला जैविक घड्याळ म्हणून ओळखले जाते.