आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Australia Visit:India Prime Minister Narendra Modi Lands In Australia, Will Attend G20 Summit

ऑस्ट्रेलियातही मोदींचा सेल्फी अंदाज, क्वींसलॅंड युनिव्हर्सिटीला दिली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: क्वींसलॅंड युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसोबत फोटो काढताना नरेंद्र मोदी.)

सिडनी (ऑस्ट्रेलिया)- पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी आज (शुक्रवार) ऑस्ट्रेलियात दाखल झाले. ब्रिस्बेन एअरपोर्टवर क्वींसलॅंडचे प्रथम नागरिक कॅंबेल न्यूमॅन यांनी मोदींचे स्वागत केले. मोदी यांनी क्वींसलॅंड युनिव्हर्सिटीला भेट दिली. निवडक विद्यार्थ्वांशी संवाद साधला. यावेळी भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे देखील उपस्थित होते.

नरेंद्र मोदी पाच दिवसीय ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पंतप्रधान टोनी एबॉट यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये युरेनियम आणि अन्य अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ‘मोदी एक्स्प्रेस’
28 वर्षांच्या खंडानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असलेले पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 17 नोव्हेंबरला त्यांच्या उपस्थितीत आयोजित जाहीर कार्यक्रमासाठी विशेष ‘मोदी ट्रेन’ धावणार आहे. मेलबर्न ते सिडनी या मार्गावर ही ट्रेन धावणार आहे. चार डबे असलेली ही रेल्वे सुमारे 220 प्रवाशांना घेऊन जाईल. मोदी एक्स्प्रेसची सर्व व्यवस्था ‘ओव्हरसिज फ्रेन्डस् ऑफ बीजेपी’ या संस्थेने केली आहे.

सोमवारी भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन नागरिकांसमोर मोदी संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी हे लोक रेल्वेने जातील. एखाद्या भारतीय पंतप्रधानाने ऑस्ट्रेलियात केलेले हे पहिले जाहीर भाषण ठरेल. या रेल्वेत अनेकांनी जागा आरक्षित केली असल्याचे संस्थेच्या मेलबर्न शाखेचे प्रवक्ते अश्विन बोरा यांनी सांगितले.

मोदी एक्स्प्रेसची सजावटही अफलातून असेल. रंगबेरंगी फुगे, पोस्टर्स आिण भारतातील काही महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे या रेल्वेत असतील. याशिवाय मोफत भोजनाची व्यवस्था यात आहे. या रेल्वेत 'मोदी ढोकळा', 'मोदी फाफडा' यासह अनेक व्यंजनांचा आस्वाद प्रवाशांना घेता येणार आहे. हा एक वेगळा अनुभव असेल, असे बोरा म्हणाले.

मोदी येथे करतील संबोधित...
न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेअरसारखे वातावरण आता सिडनी येथील 'आल्फोंस एरिना'मध्ये पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी येथे 17 नोव्हेंबरल ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांना संबोधित करतील. या कार्यक्रमाचे आयोजन मिस इंडिया-ऑस्ट्रेलिया राशी कपूर हिने केले आहे. आल्फोंस एरिनामध्ये 23 हजार पेक्षा अधिक लोक बसू शकती अशी व्यवस्था करण्‍यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वींसलॅंड युनिव्हर्सिटीला भेट दिली, पुढील स्लाईडवर बघा छायाचित्रे... घेतली वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांची भेट... केली द्विपक्षीय विषयांवर चर्चा...