(फाईल फोटो- न्युयॉर्कमध्ये नरेंद्र मोदी यांनी व्यापारी जगतातील दिग्गजांसोबत चर्चा केली. यावेळी इतरांनी नाष्टा तर मोदींनी केवळ पाणी घेतले.)
वॉशिंग्टन (अमेरिका) - वॉशिंग्टनला रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्कमध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. मोदी नाश्त्याच्या वेळी या सीईओंना भेटले. यावेळी मोदी या उद्योगपतींना म्हणाले, आम्ही मोकळ्या मनाने विचार करत आहोत. आम्हाला बदल घडवायचा आहे. पण तो एकतर्फी नसावा. सामान्य नागरिक, उद्योजक आणि गुंतवणूकदार सर्वांशी याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, थोड्याच वेळात मोदी वॉशिंग्टनला रवाना होणार आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी रात्री शाही भोजनाचे आयोजन केले आहे. त्याला अमेरिकेतील मान्यवर उपस्थित राहतील. परंतु, मोदी यावेळी केवळ पाणी घेणार आहेत.
नवरात्रीदरम्यान मोदी उपवास करीत असून गेल्या 96 तासांपासून केवळ कोमट पाणी घेत आहेत. यापूर्वी सांगण्यात आले होते, की अमेरिकी दौऱ्यात मोदी लिंबू पाणी घेतील. परंतु, मोदींनी लिंबू पाणी घेण्यासही विरोध केला असून केवळ कोमट पाण्यावर दिवस काढत आहेत.
काय आहे किटोसिस?
सध्या मोदी केवळ कोमट पाणी घेत आहेत. एखादा व्यक्ती चार दिवसांपासून केवळ पाणी घेत असेल तर शरीरातील फॅटी टिश्यूज किटोनपासून विलग होतात. त्यानंतर ते शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देतात. याला किटोसिस म्हटले जाते. सर्वसाधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती रेग्युलर जेवण घेत असते तेव्हा शरीर कार्बोहायड्रेटपासून निघाणाऱ्या ग्लोकोजचा वापर करुन ऊर्जा तयार करीत असते.
केवळ पाणी घेऊन 21 दिवसांपर्यंत राहाता येते अॅक्टिव्ह
केवळ पाणी घेऊन एखादी व्यक्ती राहत असेल तर ती सुमारे तीन आठवडे अॅक्टिव्ह राहू शकते, असे एका अभ्यासात सिद्ध झाले आहे. परंतु, अशा स्वरुपाचा उपवास करणाऱ्या व्यक्ती शारीरिक श्रम करु शकत नाहीत. सर्वसाधारणपणे अशा व्यक्ती शिथील राहतात.
50 कार्यक्रमांमध्ये होणार सहभागी
नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील उत्साह बघता ते उपवास करीत असावेत असे वाटत नाही. अमेरिकेत मोदी सुमारे 50 कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. यात युएन महासभा, मेडिसन स्क्वेअर गार्डन आणि न्युयॉर्कच्या सेंट्रल पार्कमधील भाषणांचा समावेश आहे. मेडिसनमध्ये तर मोदींनी तब्बल 70 मिनिटांचे भाषण केले होते.
जपान दौऱ्यावर असताना मोदींनी जपानी भोजनाचा घेतला होता आस्वाद.... वाचा पुढील स्लाईडवर