आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Meets Afghan President, Bhutan, Bangladesh PMs On SAARC Summit

मतभेदांची भिंत पाडू, सार्क परिषदेत मोदींचे सदस्य राष्ट्रांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - परस्परांतील मतभेद हे दक्षिण आशियातील देशांचा विकास आणि प्रगतीतील मोठा अडथळा असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मतभेदांची ही भिंत नेस्तनाबूत करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. काठमांडू येथे सार्क देशांच्या १८ शिखर परिषदेत मोदींनी पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख न करता दहशतवादी कारवायांसाठी मदत केल्याबाबत टीका केली.

३० मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, ‘शेजारी राष्ट्र या नात्याने आपण परस्परांच्या सुखदु:खात मदत केली पाहिजे. आपल्याला चांगला शेजारी मिळावा, अशी प्रत्येक देशाची इच्छा असते. देश जवळ आल्यास सोबत असण्याची शक्ती अनेक पटींनी वाढते.. आम्ही जवळ आहोत आणि सोबतही आहोत.. ’

भाषणादरम्यान मोदी म्हणाले , ज्या वेगाने आपण प्रगती साधणे आवश्यक होते, ते शक्य झाले नाही. जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करु शकलो नाही. ते म्हणाले, ‘भारत आपल्या जबाबदार्‍या पूर्णपणे पार पाडेल. भविष्यात भारातासाठी माझी काही स्वप्ने आहेत, ते दक्षिणआशियातील सर्व देशांसाठी लागू होऊ शकतात. ’

सार्क देशांतील अंतर कमी होतेय
मोदी म्हणाले, ‘दक्षिण आशियातील देश हळू हळू परस्परांच्या जवळ येत आहेत. भारत आणि बांग्लादेशाने रेल्वे, रस्ते, वीज इत्यादी सुविधांद्वारे संबंध मजबूत केले आहेत. भारत-नेपाळने ऊर्जा क्षेत्रात एका नवीन अध्यायास सुरुवात केली आहे. भारत-भूटानमधील संबंधही बळकट होत आहेत. श्रीलंकेसोबत मुक्त व्यापाराचा करार करुन आम्ही व्यावसायिक नात्याला नवा आयाम दिला आहे. मालदीवच्या तेलासंबंधी गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही लवकरच व्यवस्था करु. अंतर आणि संकटांमुळे भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीत बाधा येत आहे. रेल्वे आणि बसद्वारे भारत-पाकिस्तानही परस्परांशी जुळलेले आहेत. ’

मोदींच्या घोषणा
- सार्क देशांतील नागरिकांना ३ ते ५ वर्षांपर्यंतचा व्यावसायिक व्हिसा दिला जाईल
- व्यावसायिक प्रवासी कार्डद्वारे उद्योगपतींना भारतातील प्रवास सोपा करुन दिला जाईल.
- सार्क देशांनी भारतीय बाजारपेठेसाठी उत्पादन करावे. भारतात त्यांना समान संधी मिळेल.
- उपचारासाठी भारतात आलेल्या रुग्ण व नातेवाईकांना तत्काळ वैद्यकीय व्हिसा दिला जाईल.
- पोलिओमुक्त देशांचे सर्वेक्षण करणार. पोलिओ रुग्ण आढळल्यास लसीकरणाची सोय करणार.
- भारत २०१६ मध्ये एक उपग्रह अंतराळात सोडणार आहे. शिक्षण, टेलीमेडिसिन, आपत्ती व्यवस्थापन, हवामान अंदाज आणि संचार क्षेत्रासाठी हे उपयुक्त ठरेल.

दोन पंजाबमधील अंतर जास्त
मोदी म्हणाले, ‘आजही एका पंजाबमधून दुसर्‍या पंजाबमध्ये माल पाठवायचा असल्यास तो दिल्ली, मुंबई, दुबई आणि कराचीतून जातो. हा माल ११ पट अंतर पार करुन जातो. खर्चही चौपट होतो. सार्क देशांमधील पर्यटन हे सिंगापूर, बँकॉकमधील पर्यटनापेक्षा कठीण आहे. या देशांदरम्यान कॉल करणेही जास्त महागात जाते.’

तीन प्रस्ताव अडकवले
पाकिस्तानने सार्क संघटनेत चीनसह पर्यवेक्षक देशांची भूमिका वाढवण्याचा प्रस्काव ठेवला. भारताने हा प्रस्ताव फेटाळला. उत्तरादाखल पाकने भारताच्या तीन प्रस्तावात अडथळे आणले. सार्क देशांत वीज, रस्ते आणि रेल्वे संपर्क वाढवण्यासंबंधी हे प्रस्ताव होते. पाक व नेपाळच्या माध्यमातून चीनला सार्क देशांमधील आपले प्रभुत्व वाढलायचे आहे.

सार्ककडून मोदींच्या अपेक्षा
- सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परस्पर राष्ट्रांदरम्यान मैत्री प्रस्थापित व्हावी
- सदस्य राष्ट्रांमध्ये मजबूत सहकार्य आणि स्थैर्य असावे
- दहशतवाद आणि गुन्ह्यांशी संघर्ष करताना सर्वांनी एकत्रित यावे
- सार्क देशांतील पर्यटन जगासमोर आणले जावे. त्याची सुरुवात बौद्ध सर्किटच्या पर्यटनाने होऊ शकते