आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफॉर्म करणा-या वर्ल्ड लीडर्समध्ये मोदी दुस-या क्रमांकावर, ओबामा-पुतिन यांना पछाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - परफॉर्मंसच्या बाबतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील नेत्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. चीनचे राष्ट्रपती या नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत.
जीएमओ नावाच्या एका जपानी फर्मने केलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे जगात सर्वात चांगला परफॉर्मंस असणा-या 30 नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे. शी जिनपिंग यांना 10 पैकी 7.5 अंक मिळाले. त्यांच्या पाठोपाठ मोदींना 7.3 आणि मर्केल यांना 7.2 गुण मिळाले.
टोकियोची कंपनी जीएमओ रिसर्चने या सर्वेक्षणासाठी 26,000 लोकांची मते विचारात घेतली आहेत. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष हॉवर्ड कॅनडी स्कूलच्या एश सेंटर फॉर डेमोक्रॅटिक गव्हर्नंस अँड इनोव्हेशनने प्रकाशित केले आहे.
टॉप परफॉर्मिंग वर्ल्ड लीडर्स
क्रमांक लीडर देश गुण (10पैकी) लीडर देश गुण (10पैकी) लीडर देश गुण (10पैकी)
1 शी जिनपिंग चीन 7.5
2 नरेंद्र मोदी भारत 7.3
3 अँजेला मर्केल जर्मनी 7.2
4 बराक ओबामा अमेरिका 6.6
5 डेव्हीड कॅमरून ब्रिटन 6.5
6 फ्रान्स्वा ओलांद फ्रान्स 6.3
7 शिंजो आबे जपान 6.1
8 व्लादिमीर पुतिन रशिया 6.0