आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनीत मोदी फीवर: पंतप्रधानांची झलक पाहण्‍यासाठी प्रत्‍येकजण झाला आतुर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौर्‍याचा आज चौथा दिवस आहे. अलफोन्स एरिना येथे भारतीय समुदायाला संबोधित करण्‍यासाठी आहेत मोदी पोहचले आहेत. या मेगा इव्हेंटबद्दल भारतीय वंशाच्या नागरिकांबरोबरच जगभरातील नागरिकामध्‍ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज मोदी ब्रिस्बेनमधील क्विन्सलँड प्रांतातून सिडनीमध्ये दाखल झाले. मोदींच्‍या अमेरिका भेटीनंतर आज पुन्‍हा एकदा जगभरातील लोकांमध्‍ये मोदी काय बोलणार याविषयी क्रेझ निर्माण झाली आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय वंशाच्‍या नागरिकांमध्‍ये मोदींना पाहाण्‍यासाठी आतुरता निर्माण झाल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोदींच्‍या स्‍वागतासाठी विविध प्रकारचे कला पथक घेऊन भारतीय नागरिकांनी हजेरी लावली होती. अलफोन्‍स एरिना येथे मोदी चाहत्‍यांचा जल्‍लोष पाहायला मिळत होता. ढोल-ताशा, झांज पथक घेऊन भारतीय नागरिक मोदींचे स्‍वागत करत होते.
पुढील स्‍लाईडवर पाहा सिडनीत जल्‍लोश...