आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Modi Visited 9 11 Memorial In New York, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी यांचे ९/११ स्मृतिस्थळाला अभिवादन, आज मेडिसन गार्डनवर ‘वेलकम पार्टी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेत सध्या प्रेमाचे भरते आले आहे. भारतीय वंशाची मंडळी मातृभूमीच्या प्रेमापोटी मोदींच्या स्वागतासाठी सरसावली आहे. याचे कारणही तसेच आहे. अमेरिकी प्रशसनाने मोदींना खास आमंत्रित करून प्रेम व्यक्त केले. दुसरीकडे कार्पोरेट जगतही भारतातील बाजारपेठेवरील प्रेमापोटी सरसावले आहे. या उत्साहाच्या वातावरणात मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करताना ‘जी-ऑल’ ही संकल्पना मांडली. विविध देशांच्या जी-५, जी-७, जी-२० यांसारख्या संघटना कुचकामी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आता ऐतिहासिक मेडिसन स्क्वेअरवर मोदींच्या भाषणाची उलटगिणती सुरू झाली आहे. याच ठिकाणी एकेकाळी पोपनी जागतिक ऐक्याचा संदेश दिला होता.
"नमो' दौ-याची अशीही वैशिष्टये
१. अमेरिकेचा सर्वांत दीर्घ दौरा करणारे पहिले पंतप्रधान.
२. एखाद्या देशाचा प्रमुख प्रथमच मेडिसन स्क्वेअरवर भाषण देणार. प्रथमच थेट प्रक्षेपणही.
३. प्रथमच भारतीय वंशाचे अमेरिकी एखाद्या नेत्यासाठी रस्त्यावर उतरले.
४. प्रथमच एखाद्या पंतप्रधानाशी कार्पोरेट दिग्गजांची थेट चर्चा.
५. प्रथमच एखाद्या भारतीय पंतप्रधानाविरुद्ध त्यांच्या न्यूयॉर्क दौ-याच्या काळातच शहर न्यायालयाने समन्स बजावले. प्रशासनानेही हे समन्स फार गंभीर नसल्याचे सांगून टाकले.
६. व्हीसा बंदी केलेल्या एखाद्या व्यक्तीला प्रथमच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे निमंत्रण.
७. प्रथमच एक परदेशी पंतप्रधान १०० तासांत ५० कार्यक्रमात सहभागी होत आहेत.