कॅटेलूनिया - स्पेनच्या उत्तर-पूर्व भागातील कॅटेलूनियामध्ये ख्रिसमसशी निगडीत एक अनोखी प्रथा आहे. येथे घरामध्ये शिशु येशु आणि इतर प्रसिद्ध लोकांचे छोटे-छोटे पुतळे सजवले जातात. कॅटेलूनियामध्ये 18 व्या शतकापासून ही प्रथा चालत आली असून यामध्ये या पुतळ्यांचे पोट हलके केले जाते.
समृद्धीचे प्रतिक
या पुतळ्यांना येणाऱ्या काळात प्रगती, नवीन आशा-अपेक्षा, आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. झाडाखाली ठेवण्यात येणारे हे पुतळे मातीपासून तयार केले जातात.
विविध प्रसिद्ध चेहरे
कॅटेलूनियातील बाजारात यावर्षी विविध प्रकारचे पुतळे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदिंचेही छोटे-छोटे पुतळे आहेत. यापूर्वी महात्मा गांधी, बराक ओबामा, अँगेला मर्कल मर्लिन मूनरो, चे ग्वेरा आणि स्पेनचे राजा फिलीप यासारख्या प्रसिद्ध लोकांचे पुतळे बनवण्यात आले आहेत.
प्रथेनुसार या पुतळ्यांना लपवले जाते आणि शोधण्यासाठी नातेवाईक, मित्रांना बोलावले जाते.