आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुर्सींना पाकिस्तानमध्ये 21 तोफांची सलामी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुर्सी यांनी दक्षिण आशियाच्या दौ-याला पाकिस्तानपासून सुरुवात केली आहे. सोमवारी त्यांना नूर शाह हवाई तळावर 21 तोफांची सलामी देण्यात आली. पाकिस्तान सर्वात मोठा इस्लाम मित्र असल्याचे मुर्सी या वेळी म्हणाले. 1960 च्या दशकात गमाल अब्देल नासिर यांच्यानंतर मुर्सी पाकिस्तान दौ-यावर आलेले पहिलेच अध्यक्ष आहेत.

राष्ट्राध्यक्ष झरदारी आणि मुर्सी यांनी एकांतात चर्चा केली. झरदारी यांनी मुर्सी यांना पाकमध्ये गुंतवणूक करण्याबाबत विचारणा केली. यामध्ये पायाभूत सुविधा, ऊर्जा, खाणकाम, वस्त्रोद्योग, रिअल इस्टेट आणि पर्यटन विभागांचा समावेश आहे.पाकिस्तानच्या विविध आर्थिक क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. मुर्सी नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद दौ-यावर येणार होते. मात्र,गाझामध्ये हिंसाचार उसळल्यानंतर त्यांनी दौरा रद्द केला. दुसरीकडे इजिप्तमध्ये जमावाने रविवारी चोरीच्या आरोपाखाली दोन आरोपींना सर्वांसमक्ष फासावर लटकावले. दोघा जणांना सुरुवातीस बेदम मारहाण करण्यात आली होती. नील नदी किनाºयावरील महालात जियाद गावात ही घटना घडली.

कोर्ट परिसरात अतिरेकी हल्ला; पाच जण ठार, न्यायाधीश जखमी

पेशावर- पाकिस्तानमधील एका न्यायालयाच्या आवारात सोमवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये पाच ठार तर 30 जण जखमी झाले. जखमींमध्ये महिला न्यायाधीशाचा समावेश आहे.


दोन अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकून अंधाधुंद गोळीबार करत न्यायालयात प्रवेश मिळवला. सुरक्षा जवानांनी अतिरेक्यांवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. कोणत्याही अतिरेकी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली नाही. एका हल्लेखोराने अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुलसुम आझम यांच्या खोलीत कमरेला बांधलेल्या स्फोटाचा स्फोट घडवला. न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था होती, असा दावा खैबर पख्तुनख्वाचे माहिती मंत्री मियां इफ्तिकार हुसैन यांनी केला आहे. हल्लेखोरांनी काही जणांना ओलीस ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पोलिसांनी एका हल्लेखोराला ठार केले. हल्ल्याच्या निषेधार्थ खैबर पख्तुनख्वा बार कौन्सिलने मंगळवारी बंदची घोषणा केली आहे.