आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"तो" सिरियातील रक्तरंजीत वास्तव कॅमेऱ्यात कैद करीत होता, अखेर मृत्यूने त्याला गाठलेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस (सीरिया)- सिरियातील गृहयुद्ध जगासमोर मांडणारा रॉयटर्सचा 17 वर्षांचा फोटोग्राफर मोलहम बराकात अखेर शहिद झाला. गेल्या शुक्रवारी एलेप्पो येथील किंडी हॉस्पिटलमध्ये बंडखोर आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तो मृत्युमुखी पडला. सिरियातील वेगवेगळ्या हॉस्पिटलचा उपयोग लष्कराद्वारे सैनिकी बराकीसाठी केला जात आहे, असा दावा बराकत याने केला होता.
गेल्या दीड वर्षांपासून बराकत रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी काम करीत होता. या काळात त्याने अनेक फोटो या वृत्तसंस्थेला दिले. यावेळी गृहयुद्धासह सिरियातील दैनंदिन जीवनावरही त्याने प्रकाश टाकला होता. त्याचे फोटो जगभरातील प्रसिद्ध दैनिकांमध्ये छापून आले आहेत. फेसबुक प्रोफाईलनुसार तो इस्तांबल येथील रहिवासी असल्याचे समजते.
बराकत याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात त्याच्या कामाचे कौतुक करण्यात येत असून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. एखाद्या फोटोग्राफरच्या मृत्यूनंतर या घटनेची सोशल मीडियात एवढी चर्चा होण्याची ही पहिलीच घटना आहे.
मोलहम बराकात याने घेतलेली काही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...