वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबतच्या अनैतिक संबंधांमुळे जागतिक चर्चेचा विषय ठरलेल्या मोनिका लेव्हिन्स्कीने माध्यमांसमोर अखेर आपले मौन सोडले. 1990च्या दशकातील तिच्यासोबतच्या लफड्यामुळे क्लिंटन यांना बदनामीबरोबरच चौफेर आरोपांचा सामना करावा लागला होता. याच आरोपामुळे 1998 मध्ये रिपब्लिकन पार्टीने दबाव वाढवून क्लिंटन यांना पदावरून हटवण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला होता.
बेनिटी फेअर नियतकालिकाच्या 8 मे रोजी प्रसिद्ध होणार्या अंकात मोनिकाने लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी या लफड्याबद्दल आपणाला खेद वाटत असल्याचे म्हटले आहे. ‘भलेही माझ्या बॉसने त्या संबंधांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असेल, पण ते संबंध परस्पर सहमतीनेच आले होते,’ असे त्यांनी म्हटले आहे.
मोनिका आता 40 वर्षांची आहे. क्लिंटनबरोबरच्या लफड्यावेळी तिचे वय 20 वर्षे होते. ‘माझ्या भूतकाळाबाबत पसरवण्यात येणार्या अफवा एकदाच्या बंद करून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. मी माझ्या कथेचा वेगळ्या पद्धतीने शेवट करू इच्छिते,’ असे मोनिकाने या लेखात म्हटले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, मौन सोडण्यामागे भारतीय कारण