न्यूयॉर्क - तीन वर्षांपूर्वी इंडोनेशियातील सुलवेसी बेटावर माकडाने सेल्फी काढला होता. परंतु, आता या फोटोच्या मालकी हक्कावरून वाद पेटला आहे. वीकिपीडिया आणि छायाचित्रकार माकडच्या सेल्फीवर हक्क सांगत आहेत.
हा सेल्फी पेजवरून काढण्यास वीकिपीडियाने नकार दिला आहे. त्याचा मालकी हक्क माकडाकडे आहे छायाचित्रकारकडे नाही, असे वीकिपीडियाने सांगितले आहे. फोटो माकडाने काढला असून तो सर्वांसाठी खूला आहे. यावर कोणत्याही मानवी लेखकाचा मालकी हक्क नाही, असा संदेश वीकिपीडियाच्या संकेतस्थळावर वाचण्यास मिळतो.
वीकिपीडियाची मालकी असलेल्या वीकिमीडियाविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचा विचार चालू असल्याचा, छायाचित्रकार डेव्हिड स्लेटने सांगितले.
डेव्हिड स्लॅटर 2011 मध्ये चढाई करणा-या माकडाचे फोटो काढत होते. पण अचानक माकडाने त्यांचा कॅमेरा पळवला. त्यानंतर माकडाने त्याचे अनेक फोटो काढले. त्यापैकी काही खूप मनमोहक होते. यातील माकडाचा सेल्फी बातम्यांचा मथळा बनला.
फोटोवर माझी मालकी आहे. माकडाने केवळ बटण दाबले आणि फोटो काढले. वीकिपीडिया फोटोवर माकडाचा मालकी हक्क सांगू शकत नाही, असे स्लॅटरने स्पष्ट केले आहे. वीकिमीडियावर 30 हजार डॉलरचा नुकसान भरपाईचा दावा ठोकणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.
पुढे पाहा माकडाचे अफलातून सेल्फी....