आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडमधील एका गावावर माकडांची दहशत: घरांची लुटालूट, नागरिकांवर हल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खलोंग चरोन वाई - थायलंडमधील खलोंग चरोन वाई गावातील घरांची लुटालूट केली जात आहे. लोकांवर हल्ले होत आहेत. या गावातील लोक सध्या दहशतीखाली राहत आहेत. मात्र, कुठल्याही गुंडांच्या टोळीमुळे ही स्थिती ओढवली नसून माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे.


मी झोपेत असताना अचानक काही माकडे घरात शिरली. त्यांनी किचनमध्ये मोर्चा वळवला आणि त्यांनी गोडेतेल, साखर व औषधी घेतली, असे चालू असल्याचे खाकाजीत या रहिवाशाने सांगितले. माकडांनी स्नॅक्स पळवले, मी ते पुन्हा घेऊ शकेल, परंतु औषधाची मला आता खूप आवश्यकता होती, असे 72 वर्षीय खाकाजीत म्हणाल्या. खाकाजीत पती-पत्नीने माकडांना जाळ्यात ओढण्यासाठी अनेक उपयोग योजले. मात्र, त्याचा त्यांना उपयोग झाला नाही.

बॅँकॉकपासून 80 कि.मी. अंतरावरील 150 उंबरा असलेल्या या गावात सागरी माकडांनी गेल्या दहा वर्षांपासून उच्छाद मांडला आहे. या भागात वाढलेल्या कोळंबी मत्स्यपालन शेतीमुळे माकडांची वर्दळ वाढली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना वनातून पुरेसे खाद्य मिळत होते, मात्र आता त्यात घट झाल्यामुळे ते अन्नपदार्थाच्या शोधात लोकांच्या घरी धाड टाकत आहेत, असे गावातील प्रमुख छत्री केनछारोन यांनी सांगितले.