आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोनॅकोत आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माँटेकार्लो - आबालवृद्धांच्या आवडीची सर्कस हळूहळू अस्तंगत होत असताना फ्रान्सजवळील मोनॅको या पिटुकल्या देशात मात्र दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान माँटेकार्लो शहरात आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सवाचे आयोजन केले जाते. हे शहर खरेतर कॅसिनो या जुगारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 1974 मध्ये प्रथम सर्कस महोत्सव मोनॅकोचे राजकुमार रेनियर यांनी आयोजित केला होता. यंदाचा 36 व्या आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला. गोल्डन क्लोन हा सर्कशीच्या जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. 17 देशांचे 150 स्पर्धक यात सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी राजकुमार अल्बर्ट द्वितीय, त्यांच्या पत्नी राजकुमारी चार्लीन, महोत्सवाच्या अध्यक्षा राजकुमारी स्टेफनी यांची उपस्थिती होती. या वेळी शांघायची सर्कस आणि (दुसरे छायाचित्र) युक्रेनची स्पर्धक दारीया शशेब्रायनाच्या कवायतींनी प्रेक्षक अचंबित झाले.