आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब... 15 वर्षे चालणार मोबाइल बॅटरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - मोबाइलची जास्त आवश्यकता असते, तेव्हा बॅटरी डिस्चार्ज झाल्याचा अनुभव अनेकदा येतो. या स्थितीतून मार्ग काढल्याचा दावा एका कंपनीने केला आहे. बेसिक मोबाइल फोनमध्ये दुहेरी ‘ए’ बॅटरी लावल्यानंतर सामान्य पद्धतीने त्याचा वापर केल्यास त्यातील बॅटरी 15 वर्षांपर्यंत चालू शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. फोनच्या पाठीमागे लावलेली बॅटरी स्क्रीनवरही दिसू शकते. त्यामुळे स्क्रीनवर काही भाग उंचवटा असल्यासारखा दिसतो. अशा पद्धतीची बॅटरी मोबाइल फोन जीएसएम नेटवर्कवर काम करते. अमेरिकेच्या लास वेगास सीईएस प्रदर्शनामध्ये ही बॅटरी ठेवण्यात आली होती.

(छायाचित्र : संग्रहित)