आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than 30 People Died After Strong Earthquake Hit China

चीनमध्‍ये तीव्र भूकंप; 72 जणांचा मृत्‍यू, शेकडो जखमी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय- इराणनंतर आता चीन तीव्र भूकंपाने हादरला आहे. आज सकाळी सिचुअन भागात तीव्र भूकंपामुळे 72 जण ठार झाले असून शेकडो नागरिक जखमी झाल्‍याचे वृत्त आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 एवढी मोजण्यात आली. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, स्थानीक वेळेनुसार सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी हा भकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू लुशन कौंटी येथे होता. यान शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भुकंपामुळे अनेक इमारती कोसळल्‍या. काही भागात दरड कोसळल्‍या. त्‍यामुळे अनेकांचा मृत्‍यू झाला. मृतांचा आकडा वाढण्‍याचीही शक्‍यता आहे. दरड आणि इमारतीच्‍या मलब्‍यात अनेक जण अडकले आहेत. भूकंपानंतर चीनमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लोक सुरक्षिततेसाठी रस्त्यावर आले आहेत.

याच भागात 2008 मध्‍ये तीव्र भूकंप झाला होता. त्‍यात जवळपास 90 हजार लोकांचा मृत्‍यू झाला होता.