आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than One Terrorist In Cafe Where Incident Is Happened

Sydney : हल्लेखोर एकटा नाही, कॅफेमध्ये बंधक असलेल्या तरुणाशी पत्रकाराची चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - बंधकाशी फोनवर बोललेले पत्रकार हेडली
सिडनी - ऑस्ट्रेलियाचे एक पत्रकार रे हेडली यांनी लिंड्ट चॉकलेट कॅफेमध्ये हल्लेखोराने बंधक बनवलेल्या नागरिकांपैकी एकाबरोबर फोनवर चर्चा केली आहे. हेडलीच्या मते या व्यक्तीशी बोलताना त्यांना हल्लेखोराचा आवाजही येत होता. ते बंधकांना काही सूचना देत होते. हेडलीच्या मते ते ज्या बंधकाबरोबर बोलले तो पूर्णपणे घाबरलेला होता. बंधुकधारी हल्लेखोराला रेडिओच्या माध्यमातून चर्चा करायची होती, असेही हेडली म्हणाले.

हल्लेखोर एकटा नाही
हेडलीने दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराच्या दाव्यानुसार घटनेत त्याच्याबरोबर त्याचे काही साथीदारही आहेत. बंधकाशी बोलताना त्यांना मागे हल्लेखोराचा आवाज येत होता. त्यावरून ते एकापेक्षा जास्त असल्याचे समजल्याचे हेडली म्हणाला. बंधकाबरोबर हेडली पुन्हा चर्चा करणार होते, पण नंतर पोन लागला नाही.

वेटरनेही पाहिला हल्लेखोर
लिंड्‌ट चॉकलेट कॅफेमध्ये काम करणारा ब्रुनो नावाचा वेटर घटनेतून बाल बाल बचावला. तो ड्युटीवर पोहोचला तेव्हा त्याने कॅफेचा मुख्य दरवाजा बंद असल्याचे पाहिले. ब्रुनोसाठी ही अत्यंत आश्चर्यकारक अशी घटना होती. कारण ही वेळ ग्राहकांची गर्दी असण्याची होती. त्यामुळे त्याला शंका आली. तेवढ्यात पोलिस त्या त्याठिकाणाहून घेऊन गेले. कॅफेत किती लोक असतील हे सांगणे शक्य नसल्याचे ब्रुनो म्हणाले. एक व्यक्ती त्याठिकाणी उभा राहून काही तरी सांगत होता तर इतर सर्व त्याचे ऐकत होते, असे तो म्हणाला.
पुढील स्लाइडवर पाहा, बालबाल वाचलेला वेटर ब्रुनो