आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Morphed Photo Shows Barack Obama Watching Narendra Modi Speech

नरेंद्र मोदींचे भाषण आवर्जुन पाहतात बराक ओबामा?; या फोटोने सोशल मीडियात खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिंग्टन/ नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. देशातच नव्हे तर विदेशातही नरेंद्र मोदींची क्रेज वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे नरेंद्र मोदींचे भाषण आवर्जुन पाहत असल्याचे एका छायाचित्रात दाखवण्यात आले आहे. परंतु, हे कथित छायाचित्र 'फेसबुक'वर शेअर करण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे नेटिजन्सकडून या छायाचित्रांला मोठा प्रतिसादही मिळत आहे.

टीव्हीवर सुरु असलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण बराक ओबामा पाहत असल्याच्या छायाचित्राने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात खळबळ माजली आहे. परंतु, हे छायाचित्र मॉर्फिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, हे छायाचित्र 2011 मधील आहे. बराक ओबामा व्हाइट हाऊसमधील टीव्हीवर मिस्रचे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचे भाषण पाहत आहेत. या छायाचित्रात होस्नी मुबारक यांच्या छायाचित्रांच्या ठिकाणी नरेंद्र मोदींचे छायाचित्र मॉर्फिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.

मोदींचे लाइव्ह भाषण पाहत असलेल्या ओबामांचे हे छायाचि‍‍‍‍त्र गुजरातमधील नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे. सोशल मीडियामुळे चर्चेत आलेल्या या छायाचित्राच्या वास्तविकतेबाबत स्वत: खासदार पाटील यांना काहीच माहीत नाही. त्यांनी 'फेसबुक'वर हे छायाचित्र शेअर केले होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, या सत्य छायाचित्रांबाबत...