आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मशिदी म्हणजे दहशतवादी केंद्रे, प्रत्येक इमामावर न्यूयॉर्क पोलिसांची हेरगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - न्यूयॉर्क पोलिसांनी सर्व मशिदी दहशतवादी केंद्रे असल्याचा ठपका गोपनीयरीत्या ठेवला आहे. यामुळे पोलिसांना मशिदीतील कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करण्याचा हक्क प्राप्त होईल. मशिदीत कुठला कार्यक्रम असो अथवा नसो, पोलिस येथे येणा-या इमामांवर हेरगिरी करू शकतील.


न्यूयॉर्कमध्ये 9/11 नंतर पोलिसांनी मशिदींमध्ये कमीत कमी एक डझन टेररिझम एंटरप्राइज इन्व्हेस्टिगेशन(टीईआय) सुरू केले. दहशतवादी प्रकरणांच्या तपासामध्ये मदत करणारी ही पोलिसांची एक शाखा आहे. न्यूयॉर्क पोलिस विभागाने याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मशिदीत नमाजासाठी येणा-या कुठल्याही व्यक्तीची पोलिस चौकशी करू तसेच त्यांची निगराणीही करू शकतात, अशी तरतूद आहे.


आरोप ठेवण्यात अपयश
अनेक टीईआय ब-याच वर्षांपासून कार्यरत आहेत. कुठलीही मशिद किंवा मुस्लिम संघटना दहशतवादी असल्याचा आरोप ठेवण्यात न्यूयॉर्क पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही.