आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मॉस्कोत मेट्रो घसरुन भीषण अपघात, 19 प्रवाशांचा मृत्यू, 150 हून अधिक जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाच्या मॉस्कोमध्ये मेट्रो रेल्वेचे तीन डबे रूळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात सुमारे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मेट्रो रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातातील जखमींना टनलमधून स्ट्रेचरच्या मदतीने बाहेर काढून हवाई मार्गाने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये चालकाचाही समावेश आहे.
कसा झाला अपघात?
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार अचानक पॉवर वाढवल्यामुळे मेट्रोचा वेग वाढला त्यामुळे डबे नियंत्रणाबाहेर गेले. त्या स्थितीत ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघाच घडला. अपघातावेळी मेट्रो प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. त्याचे कारण म्हणजे सकाळच्या वेळी प्रवाशांची असलेली गर्दी.

प्रवाशांची आपबीती
अपघाताच्या वेळी मेट्रोच्या कोचमध्ये असलेल्या प्रवाशांनी सांगितले की, रेल्वेमध्ये अचानक झटक्यामुळे ब्रेक लागला. त्यामुळे वीज गेली. तर जखमींपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसा झटक्यामुळे तो हवेत फेकला गेला. रेल्वेत फ्लोरवर सगळीकडे रक्तच रक्त पसरलेले होते. अनेकांच्या डोक्यात, हाताला, पायाला मोठी दुखापत झाली.
(फोटो:अपघातानंर रेल्वेची अशी अवस्था झाली होती.)