आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत हे रेल्वेमार्ग, अत्यंत धोकादायक आहे यावरून प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पेरूच्या मटूकाना येथील रेल्वे मार्ग)
पॅरिसः वाइल्ड फोटोग्राफी, मॉडेलिंग फोटोग्राफी, वेडींग फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी असे अनेक फोटोग्राफीचे प्रकार आपण ऐकले असतील. मात्र जीन मार्क फ्रायबर्ग हे यासर्वांपेक्षा वेगळ्या फोटोग्राफीसाठी ओळखले जातात. जीन यांना फोटोग्राफीचा आवड आहे, आणि खासकरून त्यांचा रस रेल्वे मार्गांच्या फोटोग्राफीवर असतो. एका मेडिसिन इंडस्ट्रीत काम करणारे जीम यांना फिरणे आणि फोटोग्राफी करणे खुप आवडते. त्यांनी आपल्या प्रवासादरम्यान अनेक रेल्वे मार्गाचे फोटो काढले आहेत. त्यापैकी दक्षिण अमेरिकेच्या पेरू आणि चिली येथील काही आगळ्या वेगळ्या रेल्वेमार्गाचे त्यांनी काढलेले फोटो हे थोडे विशेषच आहेत.
56 वर्षीय जीम हे केवळ अशाच रेल्वेमार्गांचे फोटो काढतात, ज्यामध्ये काहीतरी विशेष असेल. जीमने काढलेले या फोटोंमध्ये उंचच उंच डोंगराला फोडून भूयारातून काढलेला रेल्वेमार्ग, एखाद्या निसरड्या डोंगरावर बनवलेला रेल्वेमार्ग, अथवा दोन दर्‍यांमधून पुलाच्या साह्याने बनवण्यात आलेला रेल्वेमार्ग अशा रेल्वेमार्गांचा समावेश आहे.
फोटोग्राफीबद्दल विचारल्यावर जीम सांगतात की, "मी फार लहान असतानाच फोटो काढायचो. वयाच्या 12 व्या वर्षी म्हणजेच 1972 पासूनच एका पेक्षा एक कॅमेर्‍यांचा वापर करायला सुरूवात केली. याच काळात मी फोटोग्राफीचे शिक्षणही घेतले. तेव्हापासूनच मला या अद्भूत रेल्वे मार्गांच्या फोटोग्राफीने आकर्षीत केले आणि तेव्हापासून मी अशा रेल्वे मार्गांच्या शोधात असतो.
पुढील स्लाईडवर पहा, जीनने काढलेले काही अद्भूत रेल्वेमार्गांचे फोटो