पॅरिस - तुम्हाला येथे दिसत असलेले रेल्वेचे छायाचित्र आहे पेरूच्या मटूकानातील. ते फ्रेंच छायाचित्रकार जीन मार्क फ्रायबर्गने आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. जीनने दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि चिली या देशात बनवण्यात आलेली रेल्वे रूटची अनेक छायाचित्रे आपल्या कॅमे-यामध्ये कैद केली आहे. तो एका औषधी कंपनीत नोकरी करत आहे. त्याला फिरायला आणि छायाचित्र काढायला खूप आवडते. विशेषत: रेल्वे रूटची. लोकांना आश्चर्यचकित करून देणारी अशीच रेल्वे रूट जीन आपल्या कॅमे-यात कैद करतो. जसे की, पर्वतांना कापून त्याच्या मधोमध बनवण्यात आलेल्या बोगद्यातून काढण्यात आलेली रेल्वे लाईन किंवा पर्वतांच्या कडेला असलेल्या रेल्वे लाइनची. अशा छायाचित्रांच्या माध्यमातून लोकांना जीन नेहमीपेक्षा वेगळ्या रेल्वे रूटची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत असतो . लहानपणापासून त्याने छायाचित्र काढण्यास सुरूवात केली. दरम्यान त्याने रीतसर छायाचित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा जीनने आपल्या कॅमे-यात केलेली रेल्वे रूटची छायाचित्रे....