आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आतापर्यंतचे 10 वादग्रस्‍त मॅगझीन कव्‍हर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिष्ठित मॅगझीन 'द वीक'च्‍या ताज्‍या अंकाच्‍या कव्‍हर पेजवरील सारनेव बंधूंच्‍या फोटोवरून मोठे वादळ उठले आहे. तमरलान आणि जोखर सारनेव हे गेल्‍या एप्रिल महिन्‍यात बोस्‍टन मॅरेथॉनदरम्‍यान झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटातील आरोपी आहेत. तमरलान पोलिसांबरोबर झालेल्‍या चकमकीत ठार झाला होता. तर जोखरला पोलिसांना जिवंत पकडण्‍यात यश आले होते.

'द वीक'ने आपल्‍या कव्‍हर पेजवर या दोघा बंधूंना दहशतवाद्याच्‍या रूपात सादर केले आहे. काही लोकांच्‍या मते, या आरोपींना जितके कृष्‍णवर्णीय दाखवण्‍यात आले आहे. ते त्‍यापेक्षा अधिक सावळे आहेत. दहशतवाद्याला वर्णभेदाशी जोडण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आल्‍यानंतरच वाद निर्माण झाला. काळे लोकच अपराधाशी जोडलेले असतात. गोरे यापासून दूर असतात, असे काही लोकांचे म्‍हणणे आहे.

'द वीक'च्‍या कव्‍हरपेजवरून असा वाद निर्माण होण्‍याची ही पहिलीच वेळ नाही. बुकस्‍टॉलवरून वाचकांचे लक्ष वेधण्‍यासाठी कव्‍हरपेजचे डिझाईन केले जाते. परंतु, असे करताना अनेक वेळा वाद निर्माण होतात. अशाच काही वादग्रस्‍त कव्‍हरपेजवर नजर टाकूयात ज्‍यांच्‍यामुळे निर्माण झाला होता वाद...