भारतात युपीए सरकारच्या कालखंडात शिक्षणाचा हक्क अस्तित्वात आला. यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळाला. देशातील अनेक भागात विविध अडथळे पार करुन विद्यार्थी
आपले शिक्षण पूर्ण करित आहे. गुजरातमधील काही गावांमध्ये दररोज शाळकरी मुले नदीतून मार्ग काढतात आणि शाळेत पोहोचतात. जगभरातील शाळकरी मुलं विविध अडथळे ओलांडून ज्ञानार्जन करित आहे. आज तुम्हाला divyamarathi.com जगभरातील सर्वात असे धोकादायक मार्ग दाखवणार आहे. ज्यांचा वापर मुलं शाळेत जाण्यासाठी करतात.
येथे छायाचित्रामध्ये दिसत असलेले विद्यार्थी चीनमधील गुलू गावातील आहे. ते भयावह अशा मार्गावरुन आपल्या शाळेला निघाले आहेत. खूप काळजीपूर्वक पावले टाकून विद्यार्थी तासभरात शाळेत पोहोचतात. ( छायाचित्र: सिपा प्रेस)
पुढे पाहा जगभरातील थरारक मार्ग... याच मार्गावरुन शाळकरी मुले शाळेत जातात...