आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Most People Will Be Left Handed Due To Birth Of Winter, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवाळ्यात जन्मणारे असतात डावखुरे, संशोधनात दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जन्माला येणारे पुरुष सरासरी डावखुरे असतात, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. सामान्यपणे दैनंदिन कामकाजात उजव्या हाताचा वापर करण्यात येतो. त्याचबरोबर सरासरी 90 टक्के नागरिकांना उजव्या हातांनीच काम करण्याची सवय असते.
डाव्या हातांनी काम करणार्‍या नागरिकांचे प्रमाण सरासरी 10 टक्के असू शकते. ऑस्ट्रिया, जर्मनीतील 13 हजार प्रौढांचा अभ्यास केला. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासात 7.5 टक्के महिला, तर 8.8 टक्के पुरुष डावखुरे आढळून आले आहेत.