आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मातेचा मृत्यू, पोटातील बाळ वाचले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - पतीसोबत कारने जाताना झालेल्या अपघातात गरोदर मातेचा मृत्यू झाला, परंतु सुदैवाने पोटातील बाळ सुखरूप असून त्याला वाचवण्यात यश मिळाले आहे. ही घटना अमेरिकेत घडली.

नथान आणि रेझी ग्लॉबर हे दोघे टॅक्सीने प्रवास करताना एका कारने दिलेल्या धडकेमुळे ही घटना घडली. अपघातानंतर ग्लॉबर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सिझेरियन केल्यानंतर बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले. टॅक्सीचा चालकही जखमी झाला असून त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेलिव्ह रुग्णालयातील डॉक्टरांनी ग्लॉबर यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे बाळाचे प्राण वाचू शकले. ब्रुकलिनमधील ग्लॉबर दांपत्य लाँग आयलंड कॉलेज हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठीच निघाले असताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला. रेझीची प्रकृती काही दिवसांपासून चांगली झाली होती, परंतु रविवारी तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेत असताना काळाने घाला घातला, अशा व्यथित शब्दांत रेझी ग्लॉबरची चुलत बहीण साराह ग्लॉकने आपल्या वेदना मांडल्या. रेझीच्या लग्नाला जेमतेम एक वर्षही झाले नव्हते. आता वाचवण्यात आलेल्या बाळाला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे.