आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother to be Kate Middleton Craves For Indian Vegetable Curry

प्रिन्सेस केटला भारतीय खाद्यपदार्थांचे डोहाळे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - डचेस ऑफ केम्ब्रिज युवराज्ञी केट मिडलटनला भारतीय खाद्यपदार्थांचे डोहाळे लागले आहेत. गरोदर असलेल्या केटने नुकताच भारतीय व्हेजिटेबल करीचा स्वाद घेतला.

केट यांचे मूळ गाव असलेल्या बकलबरी येथील एका भारतीय जोडप्याने केट यांचे करीचे डोहाळे पूर्ण केले. चान शिंगाडिया आणि त्यांचे पती हाश यांनी डचेसला घरी बनवलेली करी दिली. भारतीय करी केट यांनी खूप एन्जॉय केली. हे भारतीय जोडपे केटच्या आईवडिलांचे जवळचे मित्र आहे. सात महिन्यांची गरोदर केट गेल्या आठवड्यात विवाहाच्या दुसर्‍या वर्धापनदिनी माहेरी आल्या आहेत. केट यांनी नेमका कोणता पदार्थ खाल्ला, याची माहिती मात्र हाश यांनी दिली नाही. करीचा खमंग वास आल्याने केट आकर्षित झाल्या. त्यामुळे मग माझ्या पत्नीने त्यांना करी सर्व्ह केली. चान म्हणाल्या, मी शाकाहारी आहे. त्यामुळे केवळ शाकाहारी पदार्थ बनवते. केटच्या कुटुंबाकडून आपल्याला किती जिव्हाळ्याची वागणूक दिली जाते, याविषयी हे भारतीय जोडपे भरभरून बोलते. 2011 मध्ये झालेल्या शाही विवाह सोहळ्याची आठवणही त्यांच्याकडून ऐकायला मिळते.