आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत गोळीबार; 19 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह्युस्टन - जागतिक मातृ दिनानिमित्त आयोजित परडेमध्ये सोमवारी झालेल्या गोळीबाराने अमेरिका हादरली. बंदूकधार्‍यांनी बेछूट गोळीबार केल्याने 19 जण जखमी झाल्याची घटना लुसियाना प्रांतात घडली. सोमवारचा हा हल्ला न्यू ऑर्लिअन्स शहरात झाला. जखमींमध्ये दोन मुले आणि एका दहावर्षीय मुलीचाही समावेश आहे. सुमारे 19 जण जखमी झाले असे पोलिस आयुक्त रॉनाल सेर्पास यांनी सांगितले. गोळीबारानंतर घटनास्थळाहून तिघे पसार झाले. त्यांचे वय 18 ते 22 दरम्यान आहे. मातृ दिनाच्या परेडमध्ये दुसर्‍या रांगेत असणार्‍यांचा जखमींमध्ये समावेश आहे. दोन ते तीन हल्लेखोर तरुण परेडमध्ये अचानक घुसले व त्यांनी गर्दीवर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही सेकंदात गोळीबार करून ते तेथून पसार झाले.