आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी तरुणांमध्ये मोटारसायकलची क्रेझ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - भारतीय लोक कारकडे वळत असतानाच जपानमध्ये मात्र नागरिकांचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. सध्या जपानी तरुणांनी मोटारसायकल खरेदीचा सपाटा लावला असून चारचाकी वाहनांकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.


गेल्या वर्षी झालेल्या खरेदीवरून तरुणांचा कल लक्षात आला आहे. अनेक वर्षे जपानी लोक चारचाकीच्या पलीकडे बघायला तयार नव्हते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. अधिक सीसी क्षमतेची इंजिन असलेली बाइक बाजारात दाखल झाल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या दुचाकीला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. ही गाडी स्पोर्ट्स बाइकसारखी दिसते. त्यामुळे तिचा रेसर म्हणून वापर करण्यात येतो. दुचाकींचे अत्याधुनिक डिझाइन व माफक किंमत यामुळे खरेदीचा ओढा वाढला आहे, अशी माहिती लाइट मोटर व्हेइकल अँड मोटारसायकल असोसिएशनकडून देण्यात आली.


क्रेझ कशामुळे? : दुचाकी आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. महिलांसाठीही चांगली आहे. म्हणूनच आम्ही मैत्रिणी महिन्यातून एक-दोन वेळा आवर्जून राइडवर जाऊ लागलो आहोत, असे एका 27 वर्षीय तरुणीने सांगितले.
कोणत्या बाइक विकतात? : 250 सीसीच्या गाड्या अधिक विकल्या जातात. त्याची किंमत सुमारे 2 लाख 75 हजार रुपये (4,49, 400 येन) एवढी आहे.


किती वाढली दुचाकी विक्री?
देशात वर्षभरात 45 हजार 300 बाइक विकल्या गेल्या. 16.5 टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली. तर यंदा पहिल्या चार महिन्यांत विक्री 52.2 टक्क्यांवर पोहोचली.