आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडाने ऐकणारा बेडूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गार्डिनर सेचल प्रजातीच्या बेडकाला कान नसतात. त्यामुळे 11 मिलिमीटर आकाराच्या या बेडकाला ऐकू येत नाही, अशी आतापर्यंत शास्त्रज्ञांची समजूत होती. मात्र, या बेडकांवर सूक्ष्म अध्ययनानंतर ते तोंडाद्वारे ऐकतात, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या तोंडातील हाडे ध्वनिलहरींसाठी अम्प्लिफायरचे काम करतात. हा ध्वनी तोंडातून शरीरातील अंतर्गत कानांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे इतर सजीवांसाठी आवश्यक असलेले मध्य कान नसले तरी हा बेडूक ऐकू शकतो. जवळपास साडेसहा कोटी वर्षांपूर्वी अलिप्त राहिल्यामुळे या बेडकांमध्ये असे बदल झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. B nationalgeographic.com