आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Movement Against Shinvatra Government In Thailand, Agitators Police Fight

थायलंडमध्ये शिनवात्रा सरकार उलथवण्याचा प्रयत्न,आंदोलक-पोलिसांमध्ये धुमश्चक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या थायलंडमधील आंदोलनाला हिंसक वळण लागले. पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांच्या कार्यालयात घुसून सरकार उलथवण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांना हुसकावून लावण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांचा ठावठिकाणा लागत नसून त्यांनी पोलिस मुख्यालयात आश्रय घेतल्याचे सांगितले जाते. रामखामेहेंग विद्यापीठात शनिवारी पोलिसांसोबत उडालेल्या धुमश्चक्रीत 5 ठार झाले, तर सुमारे 45 जण जखमी झाले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये रविवारी सकाळपर्यंत जोरदार धुमश्चक्री सुरू होती. उद्या सोमवारी विरोधी पक्षाने देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयासह सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालयावर कब्जा करण्यासाठी हजारो आंदोलकांनी सचिवालयावर धडक दिली. सरकारी यंत्रणेवर कब्जा करून कामकाज ठप्प करण्याचा त्यांचा इरादा होता. सचिवालयाच्या दिशेने निघताच चमाई मारुशेट ब्रिगेड या दंगा काबू पथकाने अश्रुधुराच्या नळकांड्या आंदोलकांवर फेकल्या. आंदोलकांनीही पोलिसांवर पेट्रोलबॉम्ब, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. आंदोलक-पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुुरू होती. काही निदर्शक थाई पीबीएस या दूरचित्रवाणी कार्यालयावर चाल करून गेले, तर दुसरा गट गृहमंत्रालयाच्या परिसरात घुसला होता.
30,000 निदर्शक, पोलिसांत रविवारी धुमश्चक्री
उडाली. पोलिसांनी पाण्याचे फवारे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.