वॉशिंग्टन - भारतीय वंशाचे अमेरिकी संशोधक अखोरी सिन्हा यांचा अमेरिका सरकारने अत्यंत वेगळ्या पद्धतीने गौरव केला आहे. प्राणिशास्त्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांचे नाव अंटाक्र्टिकातील एका बर्फाच्छादित डोंगराला देण्यात आले आहे.
मिनेसोटा विद्यापीठातील अनुवंशशास्त्र व प्राणिशास्त्र विभागात ते कार्यरत आहेत. सिन्हा यांनी प्राण्यांच्या लोकसंख्येबद्दलचा विश्वासार्ह असा तपशील शोधून काढला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन डोंगराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. हा डोंगर यापुढे माउंटन सिन्हा नावाने ओळखला जाईल. मासे, पक्षी यांचे सूक्ष्म वर्गीकरण करण्याचे र्शेय त्यांना जाते. प्राण्यांच्या लोकसंख्येचा नेमका आकार, वर्तन इत्यादी सूक्ष्म माहिती त्यांनी एकत्रित केली आहे. मॅकडोनाल्ड हाइट्सपासून आग्नेय दिशेला असलेल्या डोंगराला त्यांचे नाव मिळाले आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. 1972 व 1974 मध्ये हिमनदीच्या क्षेत्रात जाण्याचा योग मला आला होता. त्या ठिकाणी 22 आठवडे मी राहिलो होतो.