आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीच्या विटांपासून तयार केलेले 12 व्या शतकातील लॉकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिबियातील त्रिपोलीपासून 130 किलोमीटर अंतरावरील कसर-अल- हज या प्राचीन इमारतीला लॉकर रूमही म्हणता येईल. 12 व्या शततकात बांधण्यात आलेल्या या इमारतीत हज यात्रेवर जाणारे सर्व प्रवासी आपापले सामान ठेवून जात असत. अगदी विमानतळावरील लॉकर रूमप्रमाणेच येथे जास्त वजनाचे सामान ठेवण्याची व्यवस्था होती.बर्बर संस्कृतीतील स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेली ही गोलाकार इमारत मातीच्या विटांपासून तयार करण्यात आली आहे. जॉर्ज लुकासच्या स्टार वॉर्स या चित्रपटात याच धर्तीवर बांधलेल्या ट्युनिशियातील इमारती दाखवण्यात आल्या होत्या. लिबियातील या इमारतीत एक मुख्य दरवाजा असून तो पुढील अंगणाच्या दिशेने उघडतो. अंगणाच्या चारही दिशांना एकावर एक खिडक्या रचलेल्या दिसून येतात. याच छोट्या लॉकर्समध्ये सामान ठेवता येत होते. पवित्र ग्रंथ कुराणमध्ये 114 आयती असल्यामुळे या इमारतीतही 114 लॉकर्स आहेत. मुस्लिम भाविक दरवर्षी हज यात्रेसाठी मक्का येथे जातात. त्यामुळे या इमारतीला कसर-अल- हज असे म्हटले आहे. अरबी भाषेत कसरचा अर्थ ‘किल्ला’ असा होतो आणि हज म्हणजे ‘पवित्र यात्रा’ होय. यात्रेच्या काळाव्यतिरिक्त उर्वरित कालावधीत या इमारतीत तेल साठवण केली जात असे.
कसर-अल- हजचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...