Home | International | Pakistan | mulla omar still lives, taliban give new information

आमचा नेता मुल्ला ओमर अद्याप जिवंत- तालिबान

agency | Update - Jul 20, 2011, 06:49 PM IST

फगाणिस्तानातील तालिबान संघटनेचा नेता मुल्ला ओमर जिवंत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अमेरिका तालिबान नेत्यांचे फोन हॅक करत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे.

  • mulla omar still lives, taliban give new information

    काबूल- अफगाणिस्तानातील तालिबान संघटनेचा नेता मुल्ला ओमर जिवंत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच अमेरिका तालिबान नेत्यांचे फोन हॅक करत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. मुल्ला ओमर मारला गेला असल्याचे तालिबानच्या एका प्रवक्त्याने सांगितल होतं. मात्र, त्याचा मृत्यू झाला नसून ओमर अद्याप जिवंत असल्याचे स्पष्टीकरण नुकतेच दिले आहे.
    अमेरिका तंत्रज्ञानाच्या जोरावर तालिबान नेत्यांचे मोबाईल फोन हॅक करत असून, माध्यमात मुद्दाम अशा अफवा पसरवल्या जात असल्याचे तालिबानने म्हटले आहे. मात्र पाकिस्तानसह तहरीक-ए-तालिबान या संघटनेने ओमर ठार झाल्याचे खंडन केले होते. आता मात्र, तालिबाननेच ओमर जिवंत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याच्या मृत्यूविषयीच्या चर्चा थांबण्याची शक्यता आहे. अमेरिकेने ओमर यांची माहिती देणाऱयाला १० मिलियन डॉलरचे बक्षिस देण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. अमेरिकेतील ९/११ हल्ल्याचा तो मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येते.


Trending