आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने द्या; पाकिस्तानी सरकारी वकिलांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- 26-11 मुंबई हल्ल्यातील आरोपींच्या आवाजांचे नमुने देण्याची मागणी पाकिस्तानी सरकारी वकिलांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडे केली आहे. या आरोपींमध्ये लष्कर ए तोयबाचा झकी ऊर रहेमान लखवीचाही समावेश आहे. यापूर्वीही आवाजाचे नमुने मागण्यात आले होते; परंतु अतिरेक्यांच्या वकिलांनी ही मागणी फेटाळली होती.

विशेष सरकारी वकील चौधरी झुल्फिकार अली यांनी फेडरल तपास संस्था (एफआयए)च्या वतीने ही मागणी केली आहे. दोन न्यायधीशांच्या खंडपीठाने सातही आरोपींना याप्रकरणी नोटीस बजावली आहे. भारताने पाठवलेले पुरावे आणि आवाजांच्या नमुन्यांशी पडताळणी करण्यासाठी एफआयए अनेक दिवसांपासून अतिरेक्यांच्या आवाजाच्या नमुन्याची मागणी करीत आहे.