आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीनावर सोडलेल्या लखवीला इस्लामाबाद पोलिसांनी पुन्हा घेतले ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - फाईल फोटो
इस्लामाबाद - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी उर रेहमान लखवीची जामीनावर सुटका होताच पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवल्याचे कलम लावून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे लखवी लगेचच मुक्त होणार नसल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने कालच लखवी याला जामीन मंजूर केला होता. दरम्यान, पाकिस्तान लखवीच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.झकी उर रेहमान लखवी हा गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील तुरुंगात बंद होता.
लखवी याला कोर्टाने दहा लाख रुपयांच्या जामीनावर सोडले. पण लखवीला जामीन मंजूर होताच पाकिस्तानच्या दहशतवादासंबंधीच्या भूमिकेवर भारतासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. पेशावरच्या हिंसाचारानंतर दोनच दिवसांत असा निर्णय अाल्याने त्याबाबत अधिक संताप व्यक्त झाला.

मुंबईवरील हल्ल्याचा कट रचणा-या आणि त्यांना मदत करणा-या सात जणांपैकी लखवी हा प्रमुख होता. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंडही तोच होता. दहशतवाद्यांना फोनवरून तोच संदेश आणि आदेशही देत होता, अशी कबुली कसाबने दिली होती. या सातपैकी इतर सहा जणांच्या विरोधात अजूनही मुंबई हल्ल्या प्रकरणी खटला सुरू आहे.