आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात सापडले मुंबई हल्ल्याचे पुरावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरांवर पाकमध्ये टाकलेल्या धाडीत मुंबई हल्ल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत. सिंध प्रांतात टाकलेल्या या धाडींत मोठय़ा प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रे, साहित्य तर सापडलेच; शिवाय 26/11 च्या हल्ल्यात सहभागी अतिरेक्यांना शस्त्रे वाटल्याची नोंदही सापडली आहे.

रावळपिंडी कोर्टात न्यायाधीश चौधरी हबीब उर रहमान यांच्यासमोर बंद खोलीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ही माहिती समोर आली. मुख्य आरोपी झकी उर रहमान लख्वीसह सात आरोपींवर हा खटला सुरू आहे. संघीय तपास संस्थेचे (एफआयए) उपसंचालक फकीर मुहम्मद आणि निरीक्षक खालिद अवान यांनी बचाव पक्षाच्या वकिलांशी युक्तिवाद करताना हे पुरावे सादर केले. कराचीतील लांधी भागात युसूफ गोठ आणि थट्टा जिल्ह्यातील मिरपूरमध्ये लष्कर-ए-तोयबाचे ट्रेनिंग कॅम्प आहेत. येथे हे पुरावे सापडले. यात आक्षेपार्ह लेख, भारतीय शहरांचे नकाशे यांचा समावेश आहे.