आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Terrorist Attack Hearing Dismiss In Pakistan

मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी पाकिस्तानात सुनावणी स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील न्यायालयाने मुंबई हल्ला प्रकरणात बुधवारपर्यंत सुनावणी स्थगित केली. विधी मंत्रालयाने न्यायिक आयोगाच्या भारत दौर्‍याबाबत अधिसूचना जारी केली नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिल्यानंतर सुनावणी स्थगित करण्यात आली. इस्लामाबादमधील विशेष दहशतवादविरोधी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. न्यायिक आयोगाची अधिसूचना बुधवारी जारी करणार असल्याची माहिती सरकारी वकील एम. अझहर चौधरी यांनी न्यायालयाला दिली.