आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mummy Found In Grand Mother Room, Germany Tenth Years Boy Claim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजीच्या खोलीत सापडली ‘ममी’, जर्मनीतील दहा वर्षांच्या मुलाचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - छतावरील आजीच्या खोलीत इजिप्तमधील ‘ममी ’ आहे, असे एका जर्मनीतील मुलाने ओरडून सांगितले. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना काही वेळ विश्वास बसला नाही, परंतु नंतर त्यांना त्यावर विश्वास ठेवावा लागला.
ही घटना उत्तर जर्मनीतील दिफोलझ भागातील एका घरातील आहे. सुरुवातीला लहान मूल बडबडत आहे, असे अगोदर सर्वांना वाटले. ही ममी खोलीतील पोटमाळ्यावर सुरक्षितपणे ठेवल्याचे आढळून आले. अनेक दशकांपासून ती अशाच स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलेक्झांडर असे या मुलाचे नाव आहे. अलेक्झांडरचे वडील लुझ वॉल्फगँग केटलर आणि त्यांचे वडील यांनी ही पेटी उत्तर आफ्रिकेतून जर्मनीत स्थलांतरित होताना आणली होती. 1950 मध्ये ते जहाजाने जर्मनीत आले होते, परंतु आजोबा केटलर यांनी त्या विषयी कधीही माहिती दिली नाही. त्याचबरोबर कुटुंबातील इतर कोणत्या सदस्याने देखील कधी त्याबद्दल उत्सुकता दाखवली नाही. सर्वांना ही वस्तू अडगळीतील एखादे जुने सामान असावे असे वाटत होते. ममी अशा प्रकारे घरात सापडणे, ही गोष्ट आमच्यासाठी गूढ आहे, परंतु सापडलेली प्राचीन वस्तू ममीचे प्रतिरूप म्हणून निश्चितपणे महत्त्वाची ठरू शकते, असे लुझ यांनी सांगितले.


दगडाची शवपेटी
अलेक्झांडर छतावरील खोलीत खेळताना त्याला एक दगडाची शवपेटी दिसून आली. त्यावर प्राचीन चित्रलिपी दिसून आली. ही ममी आता बर्लिनला पाठवण्यात आली आहे. त्याचा तपास करण्यात येत आहे. ममी लाकडी वेष्टणामध्ये आहे का, याचा शोध घेण्यात येणार आहे.


विचित्र परंपरा
जर्मनीतील उच्च्भ्रू समुदायात ममी उघडण्याची एक विचित्र परंपरा होती. 1950 च्या दशकात हा समुदाय अशा पद्धतीने ममी शोधून काढत असल्याची माहिती मिळते.त्यामुळेच लुझ यांच्या कुटुंबाने अशा प्रकारच्या ममीचे जतन केले असावे, असा अंदाज आहे.