आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musharraf May Leave Pakistan To Visit Ailing Mother In Dubai

मुशर्रफ यांच्या फार्महाऊसवर कोर्ट; न्यायाधीशांना बडतर्फ करण्याचा खटला चालणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लमाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या जीविताला धोका एवढा वाढला आहे की, त्यांच्या फार्महाऊसवर न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. याआधी त्याचे छोट्या कारागृहात रूपांतर करण्यात आले होते.
इस्लामाबाद उच्च न्यायालय म्हणाले, दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्या. कौसर अब्बास जैदी फार्महाऊसवर खटल्याची सुनावणी घेऊ शकतील. न्यायालय रजिस्ट्रारच्या अहवालानंतर हा आदेश बजावण्यात आला. जैदी यांनी फार्महाऊसच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे, असे त्यात नमूद करण्यात आले होते.
इस्लामाबाद शहराबाहेरील चक शहजादमध्ये फार्महाऊस आहे. मुशर्रफ परदेशातून परतल्यानंतर येथे राहत होते. 2007 मध्ये न्यायाधीशांना बडतर्फ करून त्यांना नजरकैद केल्याच्या आरोपासंदर्भात त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. अटकेच्या आदेशानंतर न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर दहशतवादविरोधी कलमे लावण्यात आली होती. इस्लामाबादमध्ये दहशतवादविरोधी न्यायालय नव्हते. त्यासाठी रावळपिंडीला जावे लागत होते. मुशर्रफ यांच्यावर खटला चालवण्यासाठी इस्लामाबादमध्ये या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.

मुशर्रफांसाठी का?
मुशर्रफांसाठी फार्महाऊसमध्ये छोटे कारागृह
फार्महाऊसमध्येच न्यायालय
न्यायाधीशांना जा-ये करण्यासाठी बुलेटप्रूफ गाडी

कारण काय ?
> मुशर्रफांच्या जाण्यायेण्याने त्यांच्या जीविताला धोका
> पाकिस्तान तालिबानने व्हिडिओद्वारे मुशर्रफ यांच्या हत्येची धमकी दिली आहे. त्यांच्यावर न्यायालय परिसरात हल्ला झाला आहे. मुशर्रफ यांच्यासमोर वकिलांनी निदर्शने केली आहेत.