आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफांचा मायदेशी परतण्याचा बेत रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी आपला मायदेशी परतण्याचा बेत रद्द केला आहे. घरच्या भूमीवर पाय ठेवताच अटक करण्यात येईल असा इशारा पाकिस्तान सरकार आणि सिंध प्रांतिक सरकारनेही दिला होता. हा इशारा मिळताच मुशर्रफ यांनी माघार घेतली. एप्रिल, 2009 पासून मुशर्रफ सक्तीच्या विजनवासात आहेत. ते सध्या लंडन व दुबई अशा दोन्ही ठिकाणी आल टून-पालटून निवास करतात.जानेवारी महिन्याच्या 27 ते 30 तारखेदरम्यान कोणत्याही परिस्थितीत मायदेशी परतणार, अशा वल्गना मुशर्रफ करीत होते. त्यांचा हा बेत ऐनवेळी रद्द करण्यात आला. मुशर्रफ यांच्या आॅल पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, मित्रपरिवार आणि पक्षातील नेत्यांशी विचारविनिमय केल्यानंतर त्यांनी मायदेशी परतण्याचा बेत पुढे ढकलला आहे.