आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ पाकिस्तानात परतले आहेत. तालिबानने ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यास भीक न घालता ते मायदेशी परतले. सौदी अरेबियाच्या अधिकार्यांनी पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना मायदेशी जाऊ नका, असा सल्ला दिला होता. दरम्यान, मीर हजर खान खोसो यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केली आहे. पाकिस्तानात 11 मे रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. खोसो (84) यांची प्रतिमा एका प्रामाणिक नेत्याची आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ आणि विरोधी पक्षनेत्यांना काळजीवाहू पंतप्रधानाची निवड करण्यात अपयश आले. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.
तालिबानची धमकी
तालिबानने म्हटले आहे की, मुशर्रफ पाकिस्तानमध्ये पुन्हा परतल्यास त्यांना नरकात पाठविण्यात येईल. मुशर्रफ यांनी तालिबानकडे आत्मसमर्पण करावे, अन्यथा त्यांना ठार मारण्यात येईल. आत्मघातकी पथक त्यांना मारण्यासाठी सज्ज आहे, असा संदेश तालिबानकडून देण्यात आला आहे. तालिबानचा प्रवक्ता इहसानुल्ला इहसान याने एक चित्रफीत जारी करुन मुशर्रफ हेच टार्गेट राहतील, असे म्हटले आहे. मुशर्रफ यांनी अमेरिकेसोबत दहशतवादाविरुद्ध लढ्यात पाकिस्तानलाही गुंतविले. त्यामुळेच अमेरिकेने पाकिस्तानात ड्रोन हल्ले सुरु केले. त्यामुळे मुशर्रफ यांना ठार मारण्यात येईल, असे तालिबानने म्हटले आहे.
सौदीनेही मुशर्रफ यांना संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. मायदेशात जाणे प्राणघातक ठरू शकते. असे सौदीने म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.