आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Musharraf's Poll Nomination Papers Rejected, Ambitions Quashed

लढण्‍यापूर्वीच पराभवः मुशर्रफ यांचे चारही उमेदवारी अर्ज फेटाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्‍तानात होणारी सार्वत्रिक निवडणूक लढविता येणार नाही. त्‍यांनी दाखल केलेले चारही उमेदवारी अर्ज रद्द करण्‍यात आले आहे. मुशर्रफ यांना हा मोठा दणका बसला आहे.

परवेझ मुशर्रफ यांनी कराची, कसूर, तिचराल आणि इस्‍लामाबाद येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्‍यापैकी चितराल येथूनच त्‍यांचा अर्ज स्विकारण्‍यात आला होता. परंतु, त्‍याविरोधात निवडणूक लवादात याचिका दाखल करण्‍यात आली होती. लवादाने मुशर्रफ यांच्‍या विरोधात निर्णय दिला. त्‍यामुळे त्‍यांना निवडणूक लढविता येणार नाही.

दरम्‍यान, पाकिस्‍तानच्‍या इतिहासात प्रथमच एका किन्‍नराला निवडणूक लढविण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे. बिंदिया राणाचा उमेदवारी अर्ज स्विकारला आहे. प्रारंभी बिंदियाचा अर्ज फेटाळण्‍यात आला होता.